Shiv Jayanti 2026 : शिवबा जन्मला गं जन्मला...किल्ले शिवनेरीवर रंगला शिवजन्माचा नयनरम्य सोहळा
Shiv Jayanti 2026 : संपूर्ण भारताचं आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396 वी जयंती आहे.
Continues below advertisement
Shiv Jayanti 2026
Continues below advertisement
1/7
शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
2/7
शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
3/7
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले आहेत.
4/7
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली आहे.
5/7
या ठिकाणी बाळ शिवाजीचा पाळणा जोजवून या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली आहे. त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि मर्दानी प्रात्यक्षिकही सादर करण्यात येणार आहेत.
Continues below advertisement
6/7
दरवर्षी शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर अशा भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन केलं जातं. पाळणा जोजवला जातो. त्यानंतर साहसी खेळांचं प्रात्यक्षिक केलं जातं.
7/7
तसेच, किल्ले शिवनेरीवर संपूर्ण सोहळा व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Published at : 19 Feb 2026 10:09 AM (IST)
= 7">