Satara Rain News: ऐतिहासिक दक्षिण काशीतील महागणपतीला कृष्णामाईचा वेढा; गणरायाच्या चरणापर्यंत पुराचे पाणी; मंदिर प्रशासनाकडून मंदिर बंद
Satara Rain News : सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वाई शहरातील महागणपती मंदिराला कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.
Continues below advertisement

Satara Rain News
Continues below advertisement
1/7
Satara Rain News: हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागाला मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) अक्षरशः झोडपून काढलं आहे. तर सध्या राज्यातील अनेक भागात पावसाने (Rain News) रौद्ररूप धारण केल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे.
2/7
अशातच सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वाई शहरातील महागणपती मंदिराला कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.
3/7
धोम धरणातून सुमारे 7 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली असून पुराचे पाणी थेट गणपतीच्या चरणापर्यंत पोहोचले आहे.
4/7
परिस्थिती लक्षात घेता मंदिर प्रशासनाने मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
5/7
कृष्णामाईच्या पाण्याने महागणपतीला जलाभिषेक झाल्यानंतर पुजाऱ्यांनी विधिवत पूजा करून मंदिराचे दरवाजे बंद केले.
Continues below advertisement
6/7
पाणी ओसरल्यानंतर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येईल असे आवाहन पुजारी शैला गुरव आणि मयुरी गुरव यांनी केले आहे.
7/7
image 7
Published at : 01 Aug 2026 11:53 AM (IST)