Nagpur Snakes: एक-दोन नव्हे, एकाच घरात आढळले चक्क 40 नागांची पिल्ले, कुटुंबीयांची बोबडीच वळली; दोन विषारी नागही जेरबंद, नागपूरच्या रामटेकमध्ये खळबळ
Nagpur Snakes News : नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळच्या नेरला गावात राजू ढोमने यांच्या घरामध्ये एक-दोन नव्हे तब्बल 40 नागसापांची पिल्ले आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Nagpur Snakes News
1/6
Nagpur Snakes News : नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळच्या नेरला गावात राजू ढोमने यांच्या घरामध्ये एक-दोन नव्हे तब्बल 40 नागसापांची पिल्ले आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
2/6
घटनेची माहिती मिळताच, सर्पमित्र आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून चाचेर येथील वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन सर्पमित्र प्राणी मित्र रतन कुंभरे व त्यांचे सहकारी मित्र यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
3/6
यावेळी अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने त्यांनी सर्व 40 नागसापांची पिल्ले कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडली.
4/6
त्यानंतर वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करत या सर्व पिल्लांना रामटेक वन विभागाशी संपर्क साधत वन कार्यालयामध्ये आणून एसीएफ गोविंद कुमार लूचे रेंज ऑफिसर राहुल शिंदे समक्ष पंचानामा करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील घनदाट जंगलात सुखरूप सोडण्यात आले.
5/6
वाईल्ड चॅलेंजरचे सर्पमित्र रतन कुंभरे यांच्या तत्परतेमुळे नागरिकांवरील संभाव्य धोका टळला.
6/6
मात्र एकाच घरात तब्बल 40 नागसापांची पिल्ले आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Published at : 05 Jul 2026 11:04 AM (IST)