Nagpur Leopard : बिबट्याचं थेट गावातील गोठ्यात मुक्काम, वनविभागाची रेस्क्यू टीम लावाजम्यासह पोहचली; पण डार्टसाठी आणलेली औषध निघालं कालबाह्य, अन् मग पुढे....
Nagpur Leopard : गेल्या काही महिन्यांपासून अनेक भागात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. अशातच आता नागपूर जिल्ह्यातील देवलापार गावात जंगलातून आलेला बिबट्या थेट गावातील गोठ्यात शिरल्याची घटना घडली आहे.

Nagpur Leopard
1/7
Nagpur Leopard : गेल्या काही महिन्यांपासून अनेक भागात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. अशातच आता नागपूर जिल्ह्यातील देवलापार गावात जंगलातून आलेला बिबट्या थेट गावातील गोठ्यात शिरल्याची घटना घडली आहे.
2/7
देवलापार गावातील मनोज सांगाडे यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास बिबट्या शिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं.
3/7
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाची टीम पोहचली. मात्र डार्टसाठी आणलेली औषध कालबाह्य निघाल्याने कारवाईत विलंब झाला.
4/7
दरम्यान, बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी लागणारी औषध वेळेवर उपलब्ध नव्हती, ही औषध मध्यप्रदेशातून आणावी लागली. त्यामुळे कारवाई उशिरा झाला.
5/7
या घटनेनंतर वनविभागावर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निष्काळजीपणाचे आरोप होत आहे.
6/7
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अशा घटनासाठी यंत्रणा सज्ज राहायला हवी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
7/7
मात्र या घटनेनं वनविभागाचा भोंगळ कारभार समोर आल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
Published at : 22 Mar 2026 10:15 AM (IST)