Borivali National Park : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्हिस्टाडोम टॉय ट्रेनसह 'वनराणी' आज पुन्हा धावणार
Borivali National Park Toy Train : मुंबईतील पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये आजपासून वन राणी धावणार आहे.
Continues below advertisement

Borivali National Park Toy Train
Continues below advertisement
1/7
Borivali National Park : मुंबईतील पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये आजपासून वन राणी धावणार आहे.
2/7
बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात व्हिस्टाडोम टॉय ट्रेन आणि वन राणी विंटेज टॉय ट्रेन हि गुजरातमधून दाखल झाली होती. त्या ट्रेनची चाचणी पूर्ण करून आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झेंडा दाखवून दुपारी बारा वाजता वन राणी मुंबईकरांच्या सेवेत धावणार आहे.
3/7
वन राणी पुन्हा एकदा लहानग्यांसह प्रौढांनाही भुरळ घालणारी ठरणार आहे. मागील 4 वर्षापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये वन राणी टॉय ट्रेन बंद होती.
4/7
मुंबई उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अथक प्रयत्नांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (SGNP) प्रसिद्ध ‘वन राणी’ टॉय ट्रेन आज पासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
5/7
उद्यानातील एक प्रमुख आकर्षण असलेली ही टॉय ट्रेन प्रणाली नव्याने सुसज्ज करण्यात आली असून विशेषतः मुलांना आनंददायक व रोमांचकारी अनुभव देणार आहे.
Continues below advertisement
6/7
नवीन दुसरी विंटेज टॉय ट्रेन जे की ओपन असल्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. तर पहली व्हिस्टाडोम टॉय ट्रेन, जी पारदर्शक छप्पर व मोठ्या काचेच्या खिडक्यांसह आहे ती अहमदाबादहून आली असून तिच्या चाचणी फेऱ्या पूर्ण झाली आहे.
7/7
2021 मध्ये आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये ही सेवा बंद झाली होती. पर्यटकांच्या मागणीनंतर पीयूष गोयल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ‘वन राणी’चे पुनरुज्जीवन पुन्हा गती पकडले आणि उद्यानप्रेमी, निसर्गप्रेमी व लहान मुलांची ही जुनी मागणी आता पूर्ण झाली.
Published at : 14 Mar 2026 09:06 AM (IST)