Pandharpur: मकरसंक्रातीनिमित्त सुवासिनी वाण घेऊन पंढरपुरात, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तेजाने झळाळली! आजची खास क्षणचित्रे पाहाच..
Makar sankranti 2026: मकरसंक्रांत सणानिमित्त आपल्या शेतात पिकलेले नवधान्य विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण करण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. आजची खास क्षणचित्रे पाहाच..

Makar sankranti 2026 Thousands of married women from across the state are in Pandharpur for Makar Sankranti
1/11
आज मकर संक्रांत.. आज राज्यभरातील हजारो महिला पंढरपूर मध्ये दाखल झाल्या आहेत. आपल्या शेतात पिकलेले नवधान्य रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी भल्या पहाटेपासून विठ्ठल मंदिरात महिलांची तुफानी गर्दी झाली आहे.
2/11
संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिर परिसरात महिलाराज दिसत आहे.
3/11
यानिमित्त विठ्ठल व रुक्मिणी मंदिरासह नामदेव महाद्वाराला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. याशिवाय भल्या पहाटे रुक्मिणी मातेच्या महा अभिषेकानंतर मातेला अत्यंत मौल्यवान अशा दागिन्यांचा साज चढविण्यात आला आहे.
4/11
आज मकरसंक्रांत निमित्त श्री रूक्मिणी मातेला ठेवणेतील हिरेजडित पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले. त्यामध्ये सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, जवेच्या माळा, तांबडी चिंचपेटी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, जवमणी पदक, हायकोल, सरी, कंबरकट्टा, लक्ष्मीहार अशा अलंकाराचा समावेश आहे.
5/11
आज पुण्याचे भाविक अमोल शेरे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास करण्याची सेवा अर्पण केली आहे. त्यामध्ये गाभारा, चारखांबी, नामदेव पायरी येथील भाग येथे ही सजावट करण्यात आली आहे. यासाठी शेवंती, गुलाब , बेंगलोर शेवंती , ऑर्किड , ग्रीनरी , कामिनी , भगवा झेंडू , पिवळा झेंडू व पांढरी शेवंती अशा विविध फुलांचा कल्पकतेने वापर केला आहे.
6/11
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच महिला भाविकांनी मंदिरात गर्दी केल्याने सुलभ तसेच जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने टोकन दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तसेच थेट दर्शनावर निर्बंध, पुजेची संख्या कमी करणे, महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक, आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
7/11
श्री रुक्मिणी मातेला सुवासिनी महिलांनी नवधान्याचे वाण अर्पण करण्यासाठी गर्दी केली असून, हजारो महिला भाविक पहाटेपासूनच ताटात हळद, कुंकू, तिळगुळ, ऊस, बोर, गाजर, हुरडा यासह अन्य प्रकारचे धान्य अर्पण करण्यासाठी मंदिरात आल्या आहेत.
8/11
image 7
9/11
image 8
10/11
image 9
11/11
image 10
Published at : 14 Jan 2026 07:48 AM (IST)