Weather Update: देशभरात चंद्रपूर सर्वात हॉट! सलग दुसऱ्या दिवशी पारा 45.6 अंशांवर, नागरिकांचा ताप वाढला
जयदीप मेढे
Updated at:
22 Apr 2025 05:11 PM (IST)
1
देशभरात सध्या प्रचंड उष्मा वाढला आहे. उन्हाच्या चटक्याने नागरिक कासावीस झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची नोंद झाली. चंद्रपुरात आज 45.6°cची नोंद झाली आहे.
3
आज संपूर्ण विदर्भात पारा 42 ते 46 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडताना धडकी भरलेले एवढे तापमान आहे.
4
केवळ विदर्भच नाही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ही प्रचंड तापला आहे.
5
परभणीत आज 42.2 अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर 40.9 बीड 41.7, सोलापूर 43 अंश सेल्सिअस वर गेले आहे.
6
मध्य महाराष्ट्रात पुणे 39.9 अंश सेल्सिअस अहिल्यानगर 38 नाशिक 38.4 असून उष्णतेच्या प्रचंड झळा लागत आहेत.
7
मुंबई उपनगर तसेच कोकणपट्ट्यात उष्ण व आद्र हवामान असल्याने उकाडा आणि घामाच्या धारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.