Temperature Today: उत्तर भारतात थंडीची लाट, महाराष्ट्रात हुडहुडी! आज कुठे किती निचांकी तापमान?

उत्तरेकडील राज्यांत या आठवड्यात थंडीची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. परिणामी महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे.

Continues below advertisement

Temperature Drop

Continues below advertisement
1/10
राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढू लागलाय. किमान तापमानात लक्षणीय घट जाणवू लागली आहे.
2/10
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हुडहुडी कायम आहे . थंडीमुळे ठीक ठिकाणी शेकोट्या पेटतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
3/10
बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 15 अंशांच्या खाली गेलाय. आज करमाळ्यातील जेऊरमध्ये निचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 6.5° सेल्सिअसने हे तापमान कमी झाले होते.
4/10
उत्तर भारतात सध्या बर्फ वृष्टीला सुरुवात झाली आहे. हे बर्फाळ वारे दक्षिणेकडे वाहत असल्याने महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार आहे.
5/10
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी 10 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवले गेले आहे.
Continues below advertisement
6/10
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जालना व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट लागणार असण्याची शक्यता आहे.
7/10
पुढील 24 तास कमाल व किमान तापमानात फारशी तफावत राहणार नाही. त्यानंतर पुढील तीन दिवसात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
8/10
कोकण व गोवा अलिबाग – उपलब्ध नाही दहाणू – 16.5°C गोवा (पणजी) – 19°C हर्णै – 21°C मुंबई (सीएलबी) – 21.6°C मुंबई (एससीझेड) – 18.9°C रत्नागिरी – 18.1°C
9/10
मध्य महाराष्ट्र अहिल्यनगर – 9.5°C जळगाव – उपलब्ध नाही जेऊर – 8°C कोल्हापूर – 14.8°C महाबळेश्वर – 11°C नाशिक – 9.6°C पुणे – 10.2°C सांगली – 13.7°C सातारा – 11.9°C सोलापूर – 14.9°C
10/10
नांदेड AMS – 11°C धाराशिव – 13.1°C परभणी – 11.3°C विदर्भ अकोला – 11.9°C अमरावती – 10.5°C ब्रह्मपुरी – 13°C बुलढाणा – 13°C चंद्रपूर – 13°C नागपूर – 10.5°C वर्धा – 11.4°C यवतमाळ – 9.6°C
Sponsored Links by Taboola