उन्हाचा चटका असह्य, धग वाढली; छत्रपती संभाजीनगर 41.4 अंश, पुण्यात किती? तुमच्या शहराचं तापमान तपासा,Photos

राज्यात पावसाचे इशारे पुन्हा एकदा देण्यात आले असले तरी तापमानाची उड्डाणे अधिक उंचीवर जातानाचं चित्र आहे. तुमच्या शहरात आज किती तापमान नोंदवलं जातंय, पहा..

Temperature today

1/7
राज्यात उन्हाचा चटका प्रचंड वाढलाय. प्रचंड उकाडा वाढला असून नागरिकांना घराबाहेर पडणं अशक्य वाटू लागलय.
2/7
विदर्भात आज सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा चांगलाच तापलाय.
3/7
नंदुरबारमध्ये 46 ते 48 अंशांच्यामध्ये तापमान आहे. त्या खालोखाल अकोल्यात 43.5 अंश सेल्सिअस, वाशिम 41.4 अमरावती 42.4 नागपूर 42 चंद्रपूर 42.6 गडचिरोली 41.2 भंडारा 41.4 गोंदिया 39.4 अंश सेल्सिअस वर होता.
4/7
मुंबई, ठाणे व कोकणपट्ट्यात कमाल तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर 39.7 अंश सेल्सिअसपर्यंत आहे.
5/7
मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर मध्ये 41.4 अंश बीड, परभणी 41.5 अंशांवर आहे.
6/7
किमान तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून येत्या पाच दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
7/7
मध्य महाराष्ट्र विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Sponsored Links by Taboola