IIT मुंबई कॅम्पसमध्ये 9 फूट लांबीची मगर आढळली, परिसरात खळबळ
आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये सोमवारी पहाटे 9 फूट लांबीची मगर आढळून आल्याची घटना घडली आहे.
IIT Mumbai Crocodile News
1/12
आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये सोमवारी पहाटे 9 फूट लांबीची मगर आढळून आली आहे.
2/12
मगर आढळून आल्यामुळं परिसरात काही काळ खळबळ उडाली आहे.
3/12
सुरक्षा रक्षकांना मगर दिसताच त्यांनी तात्काळ वनविभागाला याबाबतची माहिती दिली आहे.
4/12
वनविभाग आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत संयुक्त कारवाई करत मगरीला सुरक्षितपणे पकडले.
5/12
या संपूर्ण मोहिमेत मगरीला कोणतीही इजा झाली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
6/12
सध्या मगरीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, तिची प्रकृती स्थिर आहे.
7/12
तपासणीनंतर लवकरच तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
8/12
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शहरात वन्यजीवांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
9/12
वनविभाग आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत संयुक्त कारवाई करत मगरीला सुरक्षितपणे पकडले.
10/12
सध्या मगरीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, तिची प्रकृती स्थिर आहे.
11/12
image 11
12/12
image 12
Published at : 17 Mar 2026 05:52 PM (IST)