फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जलसंधारणाच्या कामाला गती देण्यावर चर्चा झाली आहे. तसेच 3 महत्वाचे करार देखील झाले
Nana patekar meeting with CM Devendra Fadnavis
1/7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जलसंधारणाच्या कामाला गती देण्यावर चर्चा झाली आहे. तसेच 3 महत्वाचे करार देखील झाले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
2/7
विशेष म्हणजे सिने अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे दोघेही आज मंत्रालयातील या बैठकीला उपस्थित होते. तसेच विविध विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
3/7
नाम फाउंडेशनचं जलसंधारणचं काम आहे, त्या संदर्भात मंत्रालयात बैठक होती, सामुदायिकरित्या जलयात्रा करायचं नियोजन असून गावागावात जाऊन काम करायचं आहे, असे नानांनी या बैठकीनंतर बोलताना म्हटले.
4/7
प्रत्येक गावात जाऊन काम करायचं आहे, लोक सहभाग होतायत त्यासंदर्भात बैठक होती. मागच्या वेळी काम सुरु केलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, मध्यंतरी एकनाथ शिंदे होते, आताही देवेंद्र फडणवीस आहेत, आमच्या कामाला कोणतीही समस्या नाही, असे नानाने सांगितले.
5/7
राज्य सरकारसोबत नाम फाऊंडेशनचा एक MOU होता त्यासंदर्भात बैठक होती. नाम ही संस्था आमची नाही सर्वांची आहे, 10 वर्ष पूर्ण करत आहोत त्याचा आनंद आहे.
6/7
9 वर्षात 1 हजारापेक्षा अधिक गावात आम्ही काम केलं आहे, आता या वर्षात अधिक गावात काम करू, यावेळेस 23 जिल्ह्यात काम करणार आहोत लोकांनी सहभागी व्हावं असं आम्ही त्यांनी आवाहन करत असल्याचे मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं.
7/7
लोकांनी लोकांसाठी सुरु केलेली चळवळ म्हणजे नाम फाऊंडेशन आहे, सरकार चांगली मदत करत आहे, त्यामुळे पुढेही चांगल काम होईल अशी आशा असल्याचेही करारानंतर बोलताना अनासपुरे यांनी म्हटलं.
Published at : 03 Feb 2025 05:39 PM (IST)