Petrol Shortage Update: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांच्या ऐशीतैशी! पेट्रोल पंपावर चक्क पाण्याची टाकी घेऊन पोहचला ग्राहक, पंप कर्मचाऱ्याकडूनही डिझेलची टाकी फुल्ल
Buldhana Petrol Shortage Update : चिखली येथील एका पंपावर ग्राहकाने चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पंपावर आला आणि टाकी भरून डीझेलही घेऊन गेला असल्याचा प्रकार घडला.

Buldhana Petrol Shortage Update
1/7
बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणवरील पंपावर इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याच बघायला मिळत आहे.
2/7
तर चिखली येथील एका पंपावर ग्राहकाने चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पंपावर आला आणि टाकी भरून डीझेलही घेऊन गेला असल्याचा प्रकार घडला.
3/7
तर इतरही ग्राहक पंपावर मिळेल ती भांडी, प्लास्टिकचे डब्बे घेऊन रांगेत लागलेले दिसले.
4/7
दुसरीकडे मात्र जिल्हाधिकारी यांनी इंधन साठ्यावर कडक निर्बंध आणले असले तरीही पंप चालकाकडून त्याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे.
5/7
परिणामी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांच्या ऐशीतैशी होतानाचं चित्र असून आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे लक्ष लागून आहे.
6/7
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या इंधनाचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये मोठी धांदल उडाली आहे. डिझेल आणि पेट्रोल मिळवण्यासाठी वाहनधारकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
7/7
विशेषतः बुलढाणा - संभाजीनगर मार्गावरील धाड येथील पेट्रोल पंपावर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. येथे तब्बल 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम होत आहे.
Published at : 27 Mar 2026 12:50 PM (IST)