Ajit Pawar Funeral: निपचित पडलेला देह, सुन्न अवस्था.. पार्थ, जय पवारने केली अंत्यविधींना सुरुवात, सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा यांना अंत्यदर्शनासाठी आणलं
अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी काहीवेळ त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. त्यानंतर काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठान त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

Ajit Pawar Funeral
1/9
राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांचे काल (२८ जानेवारी)विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्यावर बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.
2/9
त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बारामतीत दाखल झाले असून देशभरातील अनेक नेतेमंडळी आले आहेत. हजारोंचा जनसमुदाय लोटला आहे.
3/9
अजित दादांवर त्यांचे दोन्ही मुलं पार्थ आणि जय पवार अंत्यसंस्कार विधी करत आहेत.
4/9
वडिलांना अखेरचा निरोप देताना दोघेही सुन्न झाले आहेत.
5/9
वडिलांच्या अनपेक्षित, अकाली निधनाने दोघांनाही प्रचंड धक्का बसलाय.
6/9
अजित पवारांचं शेवटचं दर्शन घालण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांना हाताला धरून आणलं.
7/9
समोर कायमचे शांत झालेल्या अजित पवारांना पाहून त्या प्रचंड हेलावले;या दिसत आहेत. पतीच्या अकाली निधनाने सुन्न अवस्थेत दिसल्या.
8/9
संपूर्ण कुटुंबाने अजित दादांचं अखेरचं दर्शन घेतलं. काळीज पिळवटून टाकणारं हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर आघात करणारं आहे.
9/9
अजित पवार यांचा निपचित पडलेला देह आणि त्याकडे एकटक पाहणारे शरद पवार, हे चित्र महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावून गेले
Published at : 29 Jan 2026 12:13 PM (IST)