Shaurya Award 2023 : एबीपी माझाच्या शौर्य पुरस्काराचं वितरण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
एबीपी माझाच्या शौर्य पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माती मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझाच्या शौर्य पुरस्काराचं उत्साहात वितरण, मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील कोळंबा या गावातील लताबाई दिलीप कोळी यांच्या शौर्यांची अनोखी कहाणी आहे. लताबाई कोळी यांचे वय 55 वर्षे आहे. समोर बिबट्या आला म्हणून या वाघिणीनं थेट पूर आलेल्या तापी नदीत उडी टाकली आणि बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली खरी पण महापुराचं संकटही तितकंच बिकट होतं. प्रवाहाला प्रचंड वेग होता. त्या प्रवाहासोबत खेचल्या जाऊ लागल्या. नशिबानं केळीचं एक खोड हाती लागलं. त्याच्या आधारानं एकटीचा तो भर पुरातला प्रवास सुरु झाला. रात्रीच्या मिट्ट काळोखात तापीच्या त्या महाभयंकर पुरात तब्बल तेरा तास त्या पोहत होत्या. या तेरा तासात त्यांनी जवळपास साठ किलोमिटर अंतर पार केलं होतं.
वडाळा बरकत अली नाका इथं प्रेमप्रकरणातून तरुणाचा तरुणीवर चाकूहल्ला झाला होता. सपासप वार करत असताना पोलीस कर्मचारी मयूर पाटील तिथे पोहोचला. त्याने एक वार स्वतःच्या हातावर झेलत तरुणीचा प्राण वाचवला.
अहमगनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दरोडी येथील संजना पावडे यांनी सुद्धा मोठं धाडसाचं काम केलं आहे. संजना पावडे यांनी आपल्या नवऱ्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवणारी वाघीण आहे. तो प्रसंग कोणाच्याही अंगावर शहारा येईल असाच होता.
11 सप्टेंबरला औंरंगाबादमधल्या देवगिरी नदीला मोठा पूर आला होता. या पुराच्या पाण्यात तीन महिला अडकल्या होत्या. हळूहळू पाण्याचा जोर वाढू लागला. पाण्यात अडकलेल्या महिलांच्या जीवाला आता धोका निर्माण झाला होता. परिस्थिती गांभीर्य लक्षात येतात तिथे हजर असलेल्या पोलिस हवालदार संजय गाढे यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच तीनपैकी दोन महिलांचा जीव वाचवण्यात यश आलं.
घटना परभणीतल्या जिंतुर तालुक्यातील गडद गव्हाणवाडीतली आहे. इथल्या अंगणवाडीत विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवला जात असताना गॅसच्या पाईपला गळती लागली आणि आगीचा भडका उडाला. त्यावेळी 25 चिमुकले त्या शाळेत होते. त्यांचा जीव धोक्यात होता. एकीकडं पेटलेला सिलिंडर, समोर 25 चिमुरडे जीव आणि बाहेर फक्त बघ्यांची गर्दी होती. त्याचवेळी तिथं पोहोचले प्रवीण राठोड. कोणत्याही क्षणी सिलिंडरचा स्फोट होऊन सगळं होत्याचं नव्हतं होण्यासारखी परिस्थिती असताना प्रवीण आपल्या जिवाची पर्वा न करता आत घुसले. घाबरल्या मुलांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढलंच पण त्याचबरोबर बॉम्ब बनलेल्या सिलिंडरचा नॉबही बंद केला. संकट टळलं.
कोल्हापूरमधील दिवंगत सतीश कांबळे यांच्या धाडसाला सलाम करावा लागेल. कारण त्यांना स्कुलबस चालवत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. साक्षात मृत्युनं गाठलं असतानाही पहिल्यांदा बस नियंत्रित करुन ती थांबवली. बसमधल्या चिमुकल्यांना सुरक्षित केलं आणि मग प्राण सोडला.
कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी इथं अवघ्या पाच वर्षांचा शौर्य अंगणात खेळत होता. घरची मंडळी शेतीच्या कामात व्यस्त होती आणि नेमकं तेव्हाच अघटीत घडलं. शौर्य खेळता खेळता विहिरीत पडला आणि बुडू लागला. ही गोष्ट बाजुलाच असलेल्या नम्रताच्या लक्षात आली. आपला भाऊ बुडतो आहे हे पाहाताच तिने आरडाओरडा केला आणि कसलाही विचार न करता काठोकाठ भरलेल्या त्या विहिरीत उडी घेतली. बुडणाऱ्या शौर्यचा जीव तिने वाचवल.