हिमाचलमध्ये भूस्खलन, मनाली-लेह महामार्ग बंद पावसाचा तांडव: १९ राज्यांवर पावसाची शक्यता
हिमाचलमध्ये भूस्खलन, मनाली-लेह महामार्ग बंद जम्मू काश्मीरमध्ये उपविभागीय दंडाधिकाऱ्याच्या गाडीवर दरड कोसळली, बाप लेकाचा अंत, अमरनाथ यात्राही स्थगित

SDM OFFICER CAR CRUSHED IN ACCIDENT
1/9
मान्सूनच्या पावसाने पर्वतांमध्ये आपत्ती आणली आहे. हिमाचल प्रदेशात शुक्रवारी सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले.
2/9
गेल्या 3 दिवसांत मुसळधार पावसामुळे 289 रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे.
3/9
काल रात्री रियासी जिल्ह्यात उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) यांच्या गाडीवर भूस्खलनातील दगड कोसळला.
4/9
या दुर्घटनेत एसडीएम आणि त्यांचा मुलगा यांचा मृत्यू झाला असून, पत्नी आणि इतर दोन जण जखमी झाले आहेत.
5/9
मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा 3 ऑगस्टपर्यंत थांबवण्यात आली आहे. पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
6/9
काल सकाळी बालताल मार्गावरून यात्रा सुरू झाली होती, पण नंतर पावसामुळे ती स्थगित करण्यात आली.
7/9
शनिवारी 11 जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
8/9
हवामान खात्याने शनिवारी आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, तर बिहार आणि अरुणाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
9/9
तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्लीसह 19 राज्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Published at : 02 Aug 2025 02:06 PM (IST)