कोल्हापूरच्या राजाचे जल्लोषात आगमन; कोल्हापूरकरांच्या साक्षीने भव्य सोहळा
रंकाळावेश गोल सर्कल मित्र मंडळाच्या वतीने या श्रीगणेशाची कोल्हापूरचा राजा रुपात प्रतिष्ठापना केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया उपक्रमाचे यंदाचे हे 10 वे वर्ष आहे.
गणेश उत्सवाच्या आदल्या दिवशी रंकाळा स्टँड येथील भव्य मंडपात या श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.
शाहूनगरी कोल्हापूरचे प्रवेशद्वार तावडे हॉटेल चौकात असंख्य कोल्हापूरकर श्रीगणेशाच्या आगमन सोहळ्यासाठी उपस्थित होते.
पारंपरिक ढोल - ताशा पथक वाद्यांच्या गजरात व हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने विद्युत रोषणाईत हा सोहळा जल्लोषात पार पडला.
लालबागचा राजाचे मूर्तिकार रत्नाकर व संतोष कांबळी यांनीच मूर्ती साकारली आहे.
कोल्हापूरच्या राजाची प्रतिकृती १२ फूट उंचीची असून विविध सुवर्ण आभुषणांनी सजवलेली आहे.
कंटेनरमध्ये वाळू पसरून मुंबईतून मूर्ती कोल्हापुरात आणण्यात आली.
हालत्या देखाव्याची जुनी परंपरा असणाऱ्या या मंडळाने नेहमीच समाजभान जपले आहे.
गणेश उत्सव काळात आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर यासह विविध समाजपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातात