कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
नाना यांनी हौस म्हणून नेमबाजी सुरू केली असली तरी त्यांचा निशाणा पक्का होता. शूटिंग ते शूटिंग रेंज या सगळ्या आठवणी नेमबाज प्रशिक्षक रमेश कुसाळे यांनी सांगितल्या.
Continues below advertisement

Nana Patekar Death
Continues below advertisement
1/10
प्रतिभाशाली संवेदनशील कलाकार नाना पाटेक यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या मराठी मनावर शोककळा पसरली आहे.
2/10
नाना पाटेकरांचा कोल्हापूरशी सुद्धा विशेष ऋणानुबंध राहिला. त्यांना नेमबाजीची खूप आवड होती.
3/10
त्यामुळेच त्यांनी कोल्हापुरातील नेमबाजी प्रशिक्षक रमेश कुसाळे यांच्याकडे ट्रेनिंग घेतले होते.
4/10
एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी दुधाळी इथल्या शूटिंग रेंजची पाहणी केली होती.
5/10
टार्गेटची सुविधा व्यवस्थित नसल्याने त्यांनी स्वतः खर्च करून टार्गेटसाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवली.
Continues below advertisement
6/10
त्याच यंत्रणेमुळे कोल्हापुरातील कित्येक नेमबाज आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले
7/10
नाना यांनी हौस म्हणून नेमबाजी सुरू केली असली तरी त्यांचा निशाणा पक्का होता.
8/10
दुसरीकडे कोल्हापुरात गंगावेश परिसरात राहणारे अमर जाधव आणि त्यांचे कुटुंबीय हे अभिनेते नाना पाटेकर यांच्या कुटुंबातील एक सदस्य होते.
9/10
दरवर्षी नानांच्या मुंबईतील आणि कोरोनानंतर पुण्यातील घरी गणेशोत्सवासाठी जाधव परिवार नेहमी सहभागी होत.
10/10
नानांनी त्यांना वैद्यकीय सेवेसाठी मारुती व्हॅन रुग्णवाहिका देणगी दाखल दिली होती. नाना प्रेमी विचार मंच या नावाने अमर जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी हे वाचनालयासह विविध वैद्यकीय सेवा क्षेत्रात काम करते.
Published at : 08 Oct 2026 02:31 PM (IST)