कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?

अलिकडच्या काळात नवरदेवाची वरात घोड्यावरुन काढण्याऐवजी अलिशान कारमधून काढण्याची नवी पद्धत मोठ्या शहरात सुरू झालीय. मात्र, कोल्हापुरात नवदांपत्याची चक्क जेसीबीच्या बकेटमधून वरात चर्चेचा विषय बनली आहे.

Continues below advertisement

Kolhapur marriage JCB rally

Continues below advertisement
1/8
अलिकडच्या काळात नवरदेवाची वरात घोड्यावरुन काढण्याऐवजी अलिशान कारमधून काढण्याची नवी पद्धत मोठ्या शहरात सुरू झालीय. मात्र, कोल्हापुरात नवदांपत्याची चक्क जेसीबीच्या बकेटमधून वरात काढल्याने चर्चेचा विषय बनली आहे.
2/8
संबंधित नवरदेवाच्या वडिलांचा JCB चा व्यवसाय असल्याने या व्यावसायिकाने आपल्या मुलाच्या लग्नात हौस म्हणून वरातीसाठी चक्क JCB, पोकलेन मशिनच वापरली आहे.
3/8
राजेश दत्तात्रय माने असं वरपित्याचे नाव असून त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे जेसीबी आणि पोकलेन असे एकूण 4 मशिन्स आहेत. उच्चशिक्षित दाम्पत्य असलेल्या संकेत आणि पूजा माने यांच्या लग्नाच्या वरातीची कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली.
4/8
जगात भारी आम्ही कोल्हापुरी म्हणून जगभर ओळख असणाऱ्या कोल्हापूरात नेहमीच काहीतरी हटकं पहायला मिळतं. कोल्हापूरात कधी काय घडलं याचा काही नेम नाही.
5/8
आता हेच बघा ना, कोल्हापूरातील शिंगणापूर रोडवर नवदांपत्याची चक्क जेसीबीच्या बकेटमधून वरात काढण्यात आली. JCB व्यावसायिकाने मुलाच्या लग्नात हौस म्हणून वरातीसाठी चक्क जेसीबीचा वापर केला.
Continues below advertisement
6/8
राजेश दत्तात्रय माने यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे चार जेसीबी आहेत..त्यामुळे राजेश माने यांनी आपल्या उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात जेसीबीच्या बकेटमधून काढली.
7/8
या हटके वरातीचा आनंद वधू-वरांसह नातेवाईक मित्र परिवारांनी घेतल्याचं पहायला मिळालं. दरम्यान, उच्चशिक्षित संकेत आणि पूजा माने यांच्या लग्नाच्या वरातीची कोल्हापूरात जोरदार चर्चा रंगली आहे.
8/8
दरम्यान, या वरातीमध्ये मित्र आणि नातेवाईकांनी पैलवान आला.. पैलवान आला... यासह विविध गाण्यांवर अफलातून डान्सही केला. तर, स्थानिक नागरिकही आवर्जून ही वरात पाहायला थांबत होते.
Sponsored Links by Taboola