Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vitthal Murti Karjat : कर्जत तालुक्यात साकारतेय तब्बल 50 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती
रायगडमधील कर्जत तालुक्यात शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून 50 फूट विठ्ठल मूर्ती साकारली जात आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या विठूरायाची सुंदर अशी मूर्ती कर्जतमध्ये साकार होत आहे
कर्जतमध्ये तब्बल 50 फूट उंचीची विठ्ठल मूर्ती साकारली जाणार आहे
राज्यभरातून वारकरी मंडळी या दिवशी पंढरपूला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात.
आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते. त्याचप्रमाणे हजारो वारकरी मजल-दरमजल करत कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठूरायाच्या ओढीनं पंढरपुरात दाखल होत असतात.
पंढरपुरात पोहचल्यावर कळसाचं दर्शन, मुख दर्शन जे जे शक्य होईल तशा पद्धतीनं विठ्ठलाचे दर्शन घेत असतात.
त्याचबरोबर या दिवशी चंद्रभागा नदीत स्नान करायला देखील महत्व असल्याचं मानलं जातं. त्यामुळे चंद्रभागेचा किनारा वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो.
आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. या चातुर्मासाला भागवत धर्मात, वारकऱ्यांमध्ये, हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे.
ज्यांना पंढरपूला जाणे शक्य नाही ते एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाला नमस्कार करतात. या वेळी देवाला तुळशीपत्र वाहिले जाते. अभंग, कीर्तनासारखे कार्यक्रम आयोजित करून विठूरायाचा जयघोष केला जोतो.
आता कर्जतमध्ये या 50 फुटी विठ्ठल मूर्तीचे दर्शन कर्जत तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील भक्तांना घेता येणार आहे