जीवघेणा प्रवास सुरूच..नदीला आलेल्या पुरात ट्रॅक्टर घातले, जालन्यात सर्वदूर पाऊस, पहा Photos

पुलावून पाणी वाहत असलेल्या रस्त्यावर ट्रॅक्टर घालून स्वतःचा आणि इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार बोडखा या गावात समोर आलाय.

Jalna

1/9
जालना जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, अशावेळी अनेक उत्साही नागरिक पाण्यातून प्रवास करत आपला जीव धोक्यात घालत आहेत.
2/9
घनसावंगी तालुक्यातील बोडखा गावामध्ये काल जोरदार पावसाने नारोळा नदीला पूर आला असून गावातील पुलावरून पाणी वाहत आहे, अशा गंभीर अवस्थेत देखील काही गावकरी यातून प्रवास करतानाच दिसत आहेत.
3/9
असाच एक पुलावून पाणी वाहत असलेल्या रस्त्यावर ट्रॅक्टर घालून स्वतःचा आणि इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार बोडखा या गावात समोर आलाय.
4/9
जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली असून सर्व दूर झालेल्या पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
5/9
काल घनसावंगी मंठा आणि बदनापूर तालुक्यामध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला.
6/9
शेत शिवाराला तलावाचे स्वरूप आले असून फळ पिकांचे देखील मोठं नुकसान झाला आहे.
7/9
ड्रोनच्या माध्यमातून, शेतशिवार जलमय झाल्याचं दिसत आहे.
8/9
या पावसाने मोसंबी पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं
9/9
मशागतीचे काम देखील शंभर टक्के ठप्प झालेत.
Sponsored Links by Taboola