Jalgaon Accident : गुजरातहून येणाऱ्या वऱ्हाडाचा जळगावात भीषण अपघात, पाच जणांनी जागेवरच जीव सोडला, लोंढे फाट्याजवळ मृत्यूचा थरार
Jalgaon Accident : घटनास्थळी मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने मदतकार्य सुरू आहे. पोलिस आणि वैद्यकीय टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
Continues below advertisement

Jalgaon Accident
Continues below advertisement
1/11
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे लोंढे फाट्याच्या जवळ भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
2/11
बोलेनो कार आणि मोटारसायकल यांच्यात अपघाताची घटना घडली आहे.
3/11
गुजरात राज्यातून सारखपुड्यासाठी येणाऱ्या वऱ्हाड्यांवरती काळाने घाला घातला.
4/11
घटनास्थळी मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने मदतकार्य सुरू आहे. पोलिस आणि वैद्यकीय टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
5/11
अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही, ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
Continues below advertisement
6/11
मृतात दोन महिला,दोन पुरुष यांचा समावेश आहे. दोन जणांची प्रकृती गंभीर आहे,.
7/11
खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, ही घटना सकाळी आठ वाजता घडली आहे.
8/11
अमळनेर येथील अपघातात आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
9/11
या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
10/11
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील लोंढे फाट्याजवळ बोलेनो कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृतांचा आकडा पाचवर पोहोचला आहे.
11/11
गुजरातमधून साखरपुड्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published at : 09 Jun 2026 10:00 AM (IST)