नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्यांचा खर्च वाढणार; बाईक, फोन, टीव्हीसाऱख्या वस्तू महागणार
आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2021-22 सुरू झाले आहे. आजपासून देशात अनेत वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. हवाई प्रवासापासून ते मोबाईल फोन, दुचाकी, कार, टीव्ही, स्टील, एसी, फ्रिज आणि कूलर या वस्तू महाग होणार आहेत. म्हणजेच आजपासून महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसी, फ्रीज आणि कुलरसाठीही जास्त पैसे द्यावे लागतील. कच्चा माल महाग झाल्यानंतर कंपन्यांनी एसी-फ्रिज आणि कूलरच्या किमतीत वाढ केली आहे.
विमा प्रीमियम देखील आजपासून वाढणार आहे. विमा कंपन्या यासाठी सज्ज आहेत. विमा कंपन्यांना कोरोना काळात खर्च वाढल्याचं कारण देत प्रीमियम वाढवले आहेत.
आजपासून मोबाइल फोनही महाग झाले आहेत. अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोबाइल फोनवरील आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. फोनशिवाय चार्जर, अॅडॉप्टर, बॅटरी सारख्या अॅक्सेसरीजही महाग होतील.
टीव्ही खरेदीसाठी आजपासून दोन ते तीन हजार रुपये द्यावे लागणार आहे. चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवर बंदी आल्यापासून टीव्ही महाग होत आहेत. गेल्या 8 महिन्यांत टीव्हीच्या किंमतीत तीन ते चार हजार रुपयांची वाढ झाली आहे.
आजपासून देशातील हवाई प्रवासही महाग झाला आहे. सरकारने देशांतर्गत उड्डाणांचे किमान भाडे पाच टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली होती. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमानतळ सुरक्षा फी देखील आजपासून वाढली आहे.
बाईक, कारसह बहुतांश वाहने आजपासून महाग होणार आहेत. मारुती आणि निसानसारख्या अनेक वाहन कंपन्यांनी वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. खर्च वाढवण्याचं कारण कंपन्यांची दिलं आहे. मात्र ही वाढ किती होणार ते ऑटो कंपन्यांनी अद्याप सांगितलं नाही.
स्टील खरेदीसाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. देशांतर्गत बाजारात कच्च्या मालाची सतत किंमत वाढणे आणि उत्पादनातील घट हे स्टीलच्या किमती वाढण्याचं एक कारण आहे.