Photo: India-Israel संबंधांना 30 वर्षे पूर्ण, मुंबई-दिल्लीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन
abp majha web team
Updated at:
29 Jan 2022 11:33 PM (IST)
1
भारत आणि इस्त्रायल या दोन देशांतील ऐतिहासिक राजनयिक संबंधाना 30 वर्षे पूर्ण झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्या निमित्ताने नवी दिल्लीतील तीन मूर्ती हैफा चौक, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया आणि इस्रायलमधील मसादा किल्यावर दोन्ही देशांच्या झेंड्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
3
सन 1950 साली भारताने इस्रायलला मान्यता दिली. मुंबईमध्ये 1953 पासून इस्रायली कॉन्सुलेट कार्यरत होती.
4
आज भारतातील इस्रायलचा दूतावास आणि वाणिज्य दूतावास एकत्रितपणे इस्रायलच्या परराष्ट्र विभागाच्या जगभरातील सर्वात मोठ्या कार्यालयांपैकी एक आहे.
5
गेल्या तीस वर्षांमध्ये भारत-इस्रायल व्यापार 20 पट वाढून वार्षिक 4 अब्ज डॉलरच्या घरात पोहचला आहे.
6
इस्त्रायलने भारताच्या दहशतवादाविरोधाच्या लढाईला सक्रिय पाठिंबा दिला आहे.