एक्स्प्लोर
स्कूल चले हम... दहशतवादाला झुगारत 'दर्द'पुरात भरतेय शाळा; 'सरहद'वरील चिमुकल्यांना सॅल्यूट, पाहा फोटो
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये पर्यटनास गेलेले प्रवासी आपल्या मायभूमीत परतले. मात्र, काश्मीर खोऱ्यात या हल्ल्याची धग आणि भीती अद्यापही कायम आहे.
School chale hum dardpura
1/10

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये पर्यटनास गेलेले प्रवासी आपल्या मायभूमीत परतले. मात्र, काश्मीर खोऱ्यात या हल्ल्याची धग आणि भीती अद्यापही कायम आहे.
2/10

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यांनतर भारत पाकिस्तान सीमेवरील काही गावांमध्ये भितीचं वातावरण आहे. भारतातलं पाकिस्तान सिमेवरचं शेवटचं गाव म्हणजे दर्दपूरा. या ठिकाणी 'एबीपी माझा'ची टीम पोहचली. या दर्दपुरा गावातील मुलांची शाळा देखील एका भीतीच्या सावटाखालीच भरताना दिसून येतंय.
3/10

'दर्द'पूरा या गावचा एक इतिहास आहे, 90 च्या दशकात या गावातील पुरुषांना दहशतवाद्यांकडून लक्ष केलं जायचं. या गावातील 350 कुटुंबियांचा संसार या दहशतवाद्यांनी उद्धवस्त केला आहे. गावातील नागरिक अशिक्षित आहेत.
4/10

आपल्या वाट्याला आलेली गरीबी मुलांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून गावात सरहद संस्थेकडून सुरू करण्यात आलेल्या शाळेत मुलांना अशा परिस्थितीतही पाठवत आहे. हे पाहून पाकिस्तानच्या दहशतवादापुढे भारताच्या लोकतंत्राचा विजय झाल्याचं आशादायी चित्र म्हणता येईल.
5/10

दर्दपूरा या ठिकाणी असणाऱ्या शाळेचे काम पाहणाऱ्या मुश्ताक अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमेजवळील हे शेवटचं गाव आहे. पहलगामसारख्या घटनेचा परिणाम हा संपूर्ण काश्मिरवर झाला. त्यामुळे मुलांमध्ये भितीचं वातावरण पहायला मिळतं असल्याचे अहमद म्हणाले.
6/10

अनेक कुटुंबीय सुरुवातीला मुलांना शाळेत पाठवायला घाबरत होते. मात्र, त्यांच्या पालकांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी त्यांची मुले पाठवली आहे. मात्र, पहलगाम सारख्या घटना घडल्यानंतर काश्मिरी मुलांकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. वारंवार आम्ही भारतीय आहोत हे सांगावं लागतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
7/10

सन 1990 मध्ये दहशतवादी या गावात आसऱ्यासाठी आले किंवा त्यांची माहिती कोणी सैन्याला दिली तर त्या कुटुंबातील व्यक्तीला मारलं जायचं. त्यामुळं संपूर्ण गाव हे दहशतीखाली होतं.
8/10

घरातील कर्त्या पुरुषाला वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षितस्थळी लपवलं जायंच. त्यावेळी दहशतवाद्यांनी या गावातील 350 व्यक्तींची हत्या केली होती. प्रचंड हाल या दर्दपूरा गावाने सोसल्याचे मुश्ताक अहमद यांनी सांगितले.
9/10

सिमेवर आजही पाकिस्तानींकडून बेछुट गोळीबार केला जातो. त्यामुळे मुलांमध्ये भितीचं वातावरण आहे. मात्र तरीही मुलं आज शाळेत येत आहेत.
10/10

पहलगामसारखी घटना जिचा आम्ही निषेध करतो. आजही या मुलांचे पालक सिमेवरील सैन्यांच्या मदतीला जात असतात. सिमेवरील कुंपनाचे काम असो किंवा अन्य काही. कुटुंबियांन भारतीय जवानांसोबत काम करताना पाहून या मुलांनाही आपण भविष्यात भारतीय सैन्यात जावेसे वाटत असल्याचे इथले शिक्षक सांगतात.
Published at : 02 May 2025 08:06 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
विश्व
भारत
























