Karnataka Chitradurga Bus Accident: कंटेनर अन् बसचा भीषण अपघात, 17 जणांचा जागीच मृत्यू; घटनेनं संपूर्ण देश हादरला, PHOTO
Karnataka Chitradurga Bus Accident: कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरजवळ एका बस आणि कंटेनरचा आज पहाटे भीषण अपघात झाला आहे.

Karnataka Chitradurga Bus Accident
1/9
Karnataka Chitradurga Bus Accident: कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरजवळ एका बस आणि कंटेनरचा आज पहाटे भीषण अपघात झाला आहे.
2/9
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर सदर बस आणि कंटेनरचा अपघात झाला.
3/9
कंटेनर डिव्हायडरला धडकला आणि नंतर बसला धडकल्याने अपघात घडला.
4/9
सदर अपघातामध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 प्रवासी जखमी झाले आहेत.
5/9
अपघात झालेल्या बसमध्ये जवळपास 35 पेक्षा जास्त प्रवाशी होती.
6/9
सदर बस बंगळुरुहून कर्नाटकमधील गोकर्ण येथे जात होती.
7/9
कंटेनर बसला धडकल्यानंतर डिझेल टँकमधून गळती झाल्यामुळे आग भीषण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
8/9
अपघात झाला त्यावेळी अनेक प्रवासी झोपले होते, त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या.
9/9
पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, आग विझवली आणि बचावकार्य सुरू केले आहे.
Published at : 25 Dec 2025 07:43 AM (IST)