Joshimath: जमीन...भिंती...डोंगर...सगळंच खचतंय; पाहा जोशीमठमधील काळजाचा ठोका चुकवणारी दृष्यं
कुठे रस्त्यांवर भेगा पडल्यात..तर कुठे घरांच्या भिंतींना तडे गेलेत..कुठे घरं पडतायेत..तर कुठे भिंतींमधून पाण्याचा प्रवाह सुरु झालाय...हे कुठल्या चित्रपटातील दृष्य नसून उत्तराखंडमधील जोशीमठ (Uttarakhand Joshimath) शहरातील स्थिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउंच डोंगररांगांमध्ये वसलेलं शहर..शहराला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे..
त्यामुळे इथं येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे..आणि याच कारणांमुळे इथं विकासकामं वाढली..
बांधकामं वाढली..घरांच्या निर्मितीसह रस्ते निर्मितीसाठी डोंगर रांगांमध्ये कामं झाली..आणि आज ती सगळी विकासकामं धोकादायक बनली आहेत.
दुसरीकडे दरड कोसळण्याच्या घटना वाढल्यानं जोशीमठमध्येच असलेला आशियातला सर्वात लांब रोपवे देखील बंद करण्यात आलाय.
बॅडमिंटन कोर्टप्रमाणे रस्त्यांनादेखील मोठ्या प्रमाणावर तडे पडले आहेत. असे दृष्य शहरातील अनेक भागांमध्ये दिसत आहे.
विष्णूपुरम येथील रस्त्यांची अशी दुरवस्था झाली आहे. असे दृष्य भूकंपानंतर अनेक ठिकाणी दिसते.
आदि शंकराचार्यांमुळे जोशीमठला ओळख मिळाली..पुढे हेच शहर मोठं श्रद्धास्थान बनलं..पण, आता याच शहरावर मोठं संकट ओढवलंय.
पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून करण्यात आलेल्या विकासकामांचा हा परिणाम असल्याचा आरोप सामाजिक कायकर्ते, पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येत आहे.
शहरात स्थिती इतकी भयानक झालीय. की कोणत्याही क्षणी घराखालची जमीन खचू शकते.घर जमीनदोस्त होवू शकतं.. त्यामुळे स्थानिकंही दहशतीत आहेत.
प्रशासनाकडून तडे गेलेल्या रस्त्यांची पाहणी करण्यात येत असून शास्त्रज्ञांचे पथकही जोशीमठमध्ये दाखल झाले आहे.