एक्स्प्लोर
भारत-पाक युद्ध थांबलं पण भारताने बगलिहार धरणाचा दरवाजा पुन्हा उघडला, पाण्याचा प्रचंड लोंढा पाकिस्तानच्या दिशेने
Water Strike on Pakistan : भारताकडून पुन्हा 'वॉटर स्ट्राइक' करत बागलिहार धरणाचे अनेक दरवाजे भारताकडून उघडल्या गेले आहेत.
Water Strike on Pakistan
1/7

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य India vs Pakistan War) परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शविल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शनिवारी (10 मे) जाहीर केले. अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.
2/7

मात्र, घोषणेच्या तीन तासांनंतरच शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला. यात 7 नागरिकांचा मृत्यू झाला. तर सीमा सुरक्षा दलाचे आठ जवानही जखमी झाले आहेत. सारासार विचारांती भारताने होकार दिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू झाली होती.
3/7

परिणामी, क्षेपणास्त्रांचा जोरदर मारा केल्या नंतर आता भारताकडून पुन्हा 'वॉटर स्ट्राइक' करण्याचे ठरवले आहे.
4/7

दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान (India Pakistan War) चहूबाजूनं कोंडीत सापडला असताना भारताकडून पुन्हा 'वॉटर स्ट्राइक' करत बागलिहार धरणाचे अनेक दरवाजे भारताकडून उघडल्या गेले आहेत.
5/7

परिणामी पाण्याचा प्रचंड लोंढा पाकिस्तानच्या दिशेने वाहत आसून या एकाऐक सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
6/7

सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले होतं. आता बागलिहार दरवाजे पुन्हा उघडल्यानंतर पीओकेमध्ये पुराची शक्यता वाढली आहे.
7/7

दरम्यान, मुसळधार पावसानंतर भारताने रामबनमधील बागलिहार धरणाचे दरवाजे देखील उघडले आहेत.
Published at : 11 May 2025 12:19 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
विश्व
























