Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू

Delhi Blast: राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

दिल्लीत कारमध्ये स्फोट

Continues below advertisement
1/7
राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
2/7
नवी दिल्लीत सोमवारी (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
3/7
सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हा स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली. या स्फोटात अनेक वाहनं चक्काचूर झाल्याचं समोर आलं आहे.
4/7
स्फोटानंतर मोठी आग लागली. या आगीनंतर घटनास्थळावरुन समोर आलेल्या व्हिडिओत अनेक वाहनांचं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे.
5/7
अग्निशमन दलाला या स्फोटासंदर्भात आणि आगी संदर्भात माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
Continues below advertisement
6/7
लाल किल्ल्याजवळील चांदनी चौक येथील परिसर लोकांच्या गर्दीचा होता. लग्नसराईनिमित्त लोक खरेदीसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोहोचले होते. मात्र, दिल्ली मेट्रोच्या स्टेशनच्या गेट बाहेर असलेल्या गाडीत स्फोट झाला. यामुळं खळबळ उडाली.
7/7
अग्निशमन दलाच्या माहितीनुसार लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sponsored Links by Taboola