Ahmedabad Air India Plane Crash: बॉलिवूड हिरोईनलाही लाजवेल असं सौंदर्य, डोंबिवलीच्या एअर होस्टेस रोशनी सोनघरेचं लग्नाचं स्वप्न अधुरंच राहिलं
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत लंडनला जाणाऱ्या विमानातील 241 जणांचा मत्यू झाला. यामध्ये डोंबिवलीची असणारी क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचाही समावेश होता.

Roshni Songhare Ahmadabad Plane Crash
1/18
अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 265 जणांचा मृ्त्यू झाला.
2/18
या दुर्घटनेत विमानातील 239 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सचा मृ्त्यू झाला. यामध्ये डोंबिवलीत राहणाऱ्या रोशनी सोनघरे हिचा समावेश आहे. रोशनी सोनघरे ही एअर इंडियाच्या विमानातील केबिन क्रूचा भाग होती.
3/18
रोशनी सोनघरे ही केबिन क्रू मेंबर आणि इंस्टाग्राम ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर होती.
4/18
इंस्टाग्रामवर 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेली रोशनी सोनघरे ही एक ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर होती. तिने एअर इंडियामध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणूनही काम केले होते
5/18
अहमदाबादमध्ये झालेल्या या विमान दुर्घटनेत तिचाही मृत्यू झाला. तिच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.
6/18
रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भाऊ सोबत राहत होती.
7/18
रोशनी नवघरे हिच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सना तिच्या मृत्यूच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे.
8/18
रोशनीचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते. मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं.
9/18
रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खाजगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात.
10/18
रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले.
11/18
रोशनीला लहानपणा पासूनच एअर होस्टेस बनायचं होतं. तिने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केलं.
12/18
काल आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती. मात्र, याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
13/18
अवघ्या चार दिवसांपूर्वी ती गावी आली होती. कुलदेवतेचं दर्शन घेतलं, नातेवाईकांना भेटली. नंतर अहमदाबाद येथे गेली होती. केवळ एक आठवड्यापूर्वी तिच्याशी लग्नाबाबत चर्चा झाली होती, आणि तिला तिच्या पसंतीनं लग्न कर असं घरच्यांची सांगितलं होतं, असे रोशनीच्या मामाने सांगितले.
14/18
सध्या रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादला पोहोचले आहेत. रोशनीच्या आईला लो बीपीचा त्रास असल्यामुळे अद्याप या दु:खद घटनेची पूर्ण माहिती त्यांना देण्यात आलेली नाही.
15/18
गावाला आल्यानंतर रोशनी आजी आजोबा, काका काकी यांना भेटली. कुलदैवताचं दर्शन घेतलं. त्यानंतर घरी आल्यावर लगेच लंडनची फ्लाईट मिळाली. तिचं लग्न ठरलं नव्हतं. एक आठवड्यापूर्वीच माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. तुला जो मुलगा आवडेल त्याच्याशीच लग्न करू इतकं बोलणं आमचं झालं होतं, असे रोशनीच्या मामाने सांगितले.
16/18
इन्स्टाग्रामवर रोशनी सोनघरे हिचे तब्बल 50 हजार फॉलोअर्स होते
17/18
रोशनी हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती.
18/18
रोशनीच्या मृत्यूमुळे डोंबिवली परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
Published at : 13 Jun 2025 02:07 PM (IST)