Cars GST Price Cut : नव्या गाड्यांवर अप्रतिम ऑफर्स, Venue आणि Altroz वर मोठी बचत! वाचा सविस्तर बातमी...

Cars GST Price Cut : अलिकडेच जाहीर झालेल्या GST 2.0 निर्णयामुळे भारतात कार आणि एसयूव्ही अधिक परवडणाऱ्या ठरल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाचे सर्व प्रमुख कार उत्पादकांनी स्वागत केले.

Continues below advertisement

1 lakh off on cars due to gst 2.0

Continues below advertisement
1/11
अलिकडेच जाहीर झालेल्या GST 2.0 निर्णयामुळे भारतात कार आणि एसयूव्ही अधिक परवडणाऱ्या ठरल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाचे सर्व प्रमुख कार उत्पादकांनी स्वागत केले असून, त्यांनी त्यांच्या ICE (इंटरनल कम्बशन इंजिन) मॉडेल्सच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे.
2/11
नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू झाले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन GST दरांनुसार, 4 मीटरपेक्षा लहान (under 4m) गाड्यांवर सर्वात जास्त किंमत कपात झाली आहे.
3/11
Honda Amaze : टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत आता 10 लाखांच्या खाली आली असून त्यावर 1.2 लाखांची मोठी कपात झाली आहे. Tata Altroz : नवीन Altroz ची किंमत आता 1.10 लाखापर्यंत कमी झाली असून एकूण 1 लाखापर्यंत सूट मिळत आहे.
4/11
Toyota Taisor : Urban Cruiser Taisor चं टॉप-एंड व्हेरिएंट आता 1.11 लाखाने स्वस्त झाला आहे. Kia Sonet : टॉप-एंड व्हेरिएंटवर तब्बल 1.64 लाखापर्यंत किंमत कपात झाली असून संपूर्ण रेंजमध्ये 1 लाखापेक्षा अधिकची कपात झाली आहे.
5/11
Kia Syros : Syros वर 1.86 लाख इतकी किंमत कपात झाली असून हा या सेगमेंटमधील सर्वात मोठा डिस्काउंट आहे. Skoda Kylaq : निवडक व्हेरिएंट्सवर 1 लाखा ते 1.11 लाखाइतकी किंमत कपात झाली आहे.
Continues below advertisement
6/11
Nissan Magnite : Magnite ची किंमत आता 1 लाखापर्यंत कमी झाली आहे. Maruti Arena cars : Alto, Brezza आणि S-Presso या गाड्यांवर 1 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीची कपात झाली आहे.
7/11
Maruti Nexa cars : Fronx वर 1.12 लाखापर्यंत किंमत कपात झाली आहे. Mahindra XUV 3XO : GST कपातीनंतर XUV 3XO ची किंमत 1.56 लाखाने कमी झाली आहे आणि यासोबत इतर अतिरिक्त लाभही मिळत आहेत.
8/11
Hyundai Venue : Venue ची किंमत 1.23 लाखाने कमी झाली असून N-Line व्हेरिएंट 1.19 लाखाने स्वस्त झाले आहे.
9/11
या किंमत कपातीमुळे ग्राहकांना अधिक किफायतशीर पर्याय उपलब्ध होतील. सब-कॉम्पॅक्ट SUV आणि प्रीमियम हॅचबॅक गाड्यांमध्ये मागणी वाढेल.
10/11
4 मीटरखालील सेगमेंटमध्ये विक्रीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. GST कपातीनंतर 4 मीटरखालील गाड्यांच्या खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
11/11
आता कमी किमतीत प्रीमियम वैशिष्ट्यांसह गाड्या घेणे शक्य आहे. तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडून कार खरेदी करणे हे आता अधिक फायदेशीर ठरणार आहे.
Sponsored Links by Taboola