रुग्णास घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, पहाटेच्या दुर्घटनेत 2 ठार 5 जखमी
रुग्णवाहिकेची अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक बसू दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास घडली.
Continues below advertisement
Accident in sambhajinagar
Continues below advertisement
1/7
रुग्णवाहिकेची अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक बसू दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास घडली.
2/7
समृद्धी महामार्गावरील हड्स पिंपळ गाव शिवारात बुधवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघाताची घडली. या अपघातात समीर मोहम्मद (वय 57 वर्षे) राहणार बिहार व अमीना खातून (वय 52 वर्षे) राहणार बिहार अशी अपघातातील मयतांची नावे आहे.
3/7
रुग्णवाहिकेच्या या दुर्दैवी अपघातात प्रकाश विक्रम पाटील (वय 45) राहणार नाशिक, मोहम्मद इम्तियाज (वय 40) राहणार बिहार, गुलाबसा खातुन (वय 20) राहणार बिहार, सचिन रामदास खरे (वय 42) वर्षे राहणार नाशिक, हासीब समीर मोहम्मद (वय 37) राहणार बिहार हे या अपघातात जखमी झाले आहे.
4/7
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, समीर मोहम्मद या रुग्णाला घेऊन त्यांचे नातेवाईक रुग्णवाहिका क्रमांक एम एच 15 ईएफ 0089 ने नाशिक येथून पटणा येथील एम्स रुग्णालयाकडे जात होते.
5/7
बिहारकडे जात असताना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हडस पिंपळगाव शिवारात अज्ञात वाहनाशी रुग्णवाहिका पाठीमागून धडकली.
Continues below advertisement
6/7
अपघाताच्या घटनेनंतर अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले होते.
7/7
दरम्यान, अपघातामध्ये रुग्णवाहेकेचेही मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. रुग्णवाहिकेला क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरुन हटविण्यात आले आहे.
Published at : 05 Feb 2025 04:08 PM (IST)