BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
BJP Chhatrapati Sambhajinagar : कालपासून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपली खदखद व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीत डावलल्याने त्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे.
BJP Chhatrapati Sambhajinagar
1/13
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) भाजपने तिकीट कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले, काहींनी तीव्र संताप व्यक्त करत नेत्यांवर आरोप करत शिवीगाळही केली.
2/13
एकीकडे दोन महिला उमेदवारांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. तर दुसरीकडे एका उमेदवाराने भाजप नेते अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या गाड्या अडवत त्यांच्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेतलं.
3/13
कालपासून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपली खदखद व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीत डावलल्याने त्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे.
4/13
प्रशांत भदाणे पाटील यांनी आज संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) भाजपच्या कार्यालयासमोर मंत्री अतुल सावे यांच्या गाडीसमोर मोठा राडा केला.
5/13
इतरही अनेक उमेदवारांनी तिकीट नाकारल्याने सकाळापासूनच मंत्री अतूल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्यावर असंतोष व्यक्त केला जात आहे.
6/13
अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना आता तिकीट वाटपात बाहेरचा रस्ता दाखवल्या जात असल्याचा आरोप पक्ष नेतृत्वावर करण्यात येत आहे. यावेळी पोलिस संरक्षणात सावे आणि कराड यांनी काढता पाय घेतला.(Chhatrapati Sambhajinagar)
7/13
प्रशांत भदाणे पाटील यांनी सर्व्हेची कागदपत्र दाखवत "मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो, रात्रंदिवस पक्षासाठी झटलो, पण साहेबांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझा घात केला," असा आरोप भदाने पाटील या संतप्त कार्यकर्त्याने केला.
8/13
"मला अंधारात ठेवले गेले, आता जर मला काही झाले तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच कराड यांनी जातीवर आणि सावे यांनी त्यांच्या पीएला नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
9/13
प्रशांत भदाणे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, भाजप असा पक्ष आहे की, अन्याय करत नाही, म्हणून आम्ही २० वर्षांपासून काम करत आहोत. त्यांनी आमच्यावरती अन्याय केला आहे.
10/13
मी २५ वर्षे भाजपचं काम केलं. तुला तिकीट देतो असं दुपारीपर्यंत सांगितलं, आणि सावेंच्या पीएला तिकीट दिलं.
11/13
भागवत कराडांनी त्यांच्या जातीच्या माणसाला तिकीट दिलं. त्याला सर्व्हेत फक्त दोन टक्का सुध्दा नाही. तरी त्याला तिकीट दिलं, मी रात्रंदिवस झटलो, मी भाजपसाठी सगळं बरबाद करून काम केलं, मी कचराकुंडीसुध्दा दिली.
12/13
एकाने जातीचा दिला आणि एकाने पीएला दिलं. ही जनतेची पार्टी होती, आणि त्यांनी जनता सोडली आणि आता ही पार्टी प्रायव्हेड लिमीटेड करून टाकली. यांच्यात दम आहे तर सांगावं, सर्व्हे आणावा, मला त्यांनी अंधारात ठेवलं, मी इतका अन्याय सहन करू शकत नाही.
13/13
हा सर्वे देवेंद्र फडणवीसांना पाठवा, मी सगळीकडे सर्व्हेमध्ये पुढे असून मला अंधारात ठेवलं, त्यांनी पीएला उमेदवारी दिली. सावेंना हे करून काय भेटलं असा सवालही प्रशांत भदाणे पाटील या संतप्त उमेदवारांनी केला आहे.
Published at : 31 Dec 2025 01:22 PM (IST)
= 13">