Buldhana Accident : बुलढाण्यातील अपघाताची अंगावर काटा आणणारी दृश्यं, दणकट बोलेरो जीपचा चेंदामेंदा, आतमध्ये बसलेले पाच जण....
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले आहे.

Buldhana Accident news
1/9
बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले आहे.
2/9
तर या भीषण अपघातात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. खाजगी प्रवासी बस, एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला आहे.
3/9
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत.
4/9
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.
5/9
मात्र हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
6/9
प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली.
7/9
हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे, त्यातील 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे.
8/9
खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अद्याप फसला असून त्याला बाहेर काढण्याचे काम सध्या पोलिसांकडून केलं जात आहे.
9/9
हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजार असून पुढील कारवाई केली जात आहे.
Published at : 02 Apr 2025 07:35 AM (IST)