एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Bhiwandi: भिवंडीत अग्नितांडव! फर्निचरच्या गोदामाला भीषण आग; 7 ते 8 गोदाम आगीच्या भक्षस्थानी
राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना अनेक आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक आगीच्या भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या हद्दीत घडली आहे. यात स्वागत कंपाउंड मधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.
Bhiwandi fire accident news
1/7

Bhiwandi News : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना अनेक आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक आगीच्या भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या हद्दीत घडली आहे. यात स्वागत कंपाउंड मधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.
2/7

या भीषण अपघाताच्या घटनेत फर्निचरची 7 ते 8 गोदाम जळून खाक झाली आहे. तसेच फर्निचरची पूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी आल्याचेही चित्र आहे.
3/7

दरम्यान, या आगीतील धूराचे लोळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरूनही पाहिले जात आहे.
4/7

आगीच्या आसपास रहीवाशी परिसर असल्याने सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत.
5/7

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
6/7

मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाहीये. तर आगीचे कारणही अजूनही अस्पष्ट आहे.
7/7

आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अजूनही किती वेळ लागेल हे ही सांगता येत नाहीये. तर फर्निचर गोदामाच्या शेजारी कापडाचा मोठा गोदाम असून त्याला ही आग लागण्याची शक्यता बाळवली आहे.
Published at : 26 Apr 2025 11:23 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















