तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
दिव्यांग कल्याण विभागाचे माजी सचिव तथा आय. ए. एस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. स्वत: तुकाराम मुंढेंनी आईच्या आठवणी जागवत याबाबत माहिती दिली होती.
Continues below advertisement

Tukaram mundhe viral mother memories tree
Continues below advertisement
1/8
दिव्यांग कल्याण विभागाचे माजी सचिव तथा आय. ए. एस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. स्वत: तुकाराम मुंढेंनी आईच्या आठवणी जागवत याबाबत माहिती दिली होती.
2/8
बीड जिल्ह्यातील त्यांच्या ताडसोना या मूळगावी आसराबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईचे निधन झाले तेव्हा तुकाराम मुंडे प. बंगालमध्ये सेवेत होते, तेथून ते पुण्याला आले, नंतर आपल्या मूळगावी गेले.
3/8
आपल्या आईच्या निधनानंतर तुकाराम मुंढे यांच्यातला भावनिक माणूस महाराष्ट्राने पाहिला, बंधूंच्या गळ्यात पडून ते रडताना सर्वजण भावुक झाले होते. मातोश्रींच्या पार्थिवावर अत्यंसस्कार झाल्यानंतरही तुकाराम मुंढे यांच्यातला सामाजिक जावीण जपणारा माणूस दिसून आला.
4/8
पारदर्शक कारभार, शिस्तप्रिय प्रशासन काटेकोर नियमांचे पालन करून निर्णय आणि अनियमितता खपवून न घेणारे अशी तुकाराम मुंडे यांची महाराष्ट्राला ओळख आहे.
5/8
आईच्या मृत्यूनंतर तुकाराम मुंढे यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही त्यांनी एक आदर्श उदाहरण दाखवून दिले आहे. अंत्यविधी झाल्यावर कसल्याही अनावश्यक प्रथा परंपरा रूढींना बाजूला ठेवत त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आईच्या अस्थींचे विसर्जन केले.
Continues below advertisement
6/8
imविशेष म्हणजे 10 दिवसांची वाट न पाहता आणि कुठल्याही नदीतरी न जाता वेगळ्या पद्धतीने त्यांनी आईंच्या अस्थींचे विसर्जन केले.
7/8
आपल्या शेतातील घरासमोर एक खड्डा खांदून त्यात आईच्या अस्थिविसर्जत करत त्यावर एक वडाचे रोपटे लावण्यात आले आहे. यावेळी, स्वत: त्यांनी ते रोपटे घेऊन, खड्डा खांदून, माती ओतून ते रोपटे लावले.
8/8
तुकाराम मुंढेंनी अस्थि विसर्जनापासून पुढे होणाऱ्या कर्मकांडांच्या विधींना फाटा दिल्याचे दिसून आले, या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून त्यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे.
Published at : 05 Apr 2026 05:23 PM (IST)