10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती, नवं अलिशान घरं ठरलं कारण? नर्तिका-उपसरपंच प्रेमप्रकरणाची 'डिमांड स्टोरी'
बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकामसला गावातल्या उपसरपंचाने सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात नर्तकीच्या घरासमोर आपल्या गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
Continues below advertisement
Solapur dancer lovestory beed
Continues below advertisement
1/8
बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकामसला गावातल्या उपसरपंचाने सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात नर्तकीच्या घरासमोर आपल्या गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
2/8
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तेव्हा ही आत्महत्या असल्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. मात्र, हा घातपात असल्याचा आरोप उपसरपंचाच्या नातेवाईकांनी केला आहे.
3/8
माझे मामा निर्व्यसनी होते, त्यांच्याकडे पिस्तूल नव्हते, त्यांच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. हा घातपात असल्याचा संशय आणि आरोप उपसरपंचाच्या भाच्याने केला. मागील सहा महिन्यांपासून ते मानसिक तणावात होते.
4/8
गेवराई येथील प्लॉट नावावर करून देणे अशी मागणी करुन देण्यासाठी त्या महिलेकडून ब्लॅकमेल केलं जात असल्याचं देखील यावेळी भाच्याकडून सांगण्यात आलं.
5/8
सोन्याच्या दागिन्यांसह लाख रुपयांचा मोबाईल उपसरपंचाने पूजा गायकवाड हिला गिफ्ट केला होता. याचवेळी नर्तकेकडून गेवराईतील एका आलिशान घराची मागणी केली जात होती.
Continues below advertisement
6/8
गेवराईमधील हेच घर या सरपंचाचे मृत्यूचे कारण ठरले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, शहरातील माधवनगर भागात असलेल्या या घराची 10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती झाली होती.
7/8
हत्या प्रकरणानंतर त्यांची बदनामी केली जात असून राजकारणातल्या व्यक्तींनीच त्यांची ओळख महिलेसोबत करून दिली. केवळ पैसे काढण्यासाठी संबंध जुळवून देण्यात आले. त्यामुळे, आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी उपसरपंचाच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.
8/8
दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून नर्तिका पूजा गायकवाडविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मृत गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने याबाबत तक्रार दिली आहे.
Published at : 10 Sep 2025 07:51 PM (IST)