Tukaram Munde Akola: टीप मिळाली अन् मध्यरात्रीच्या सुमारास तुकाराम मुंढेंच्या पथकाची मोठी कारवाई; लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह 12 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
Tukaram Munde Akola: वाहतूक केला जाणारा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक गुटखासाठा जप्त करण्यात आला.
Continues below advertisement

Tukaram Munde Akola
Continues below advertisement
1/11
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात 'तुकाराम मुंढे' यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.
2/11
वाहतूक केला जाणारा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक गुटखा साठा जप्त करण्यात आला.
3/11
तब्बल 7 लाखांचा हा गुटखा साठा आहे.
4/11
मालवाहू वाहनातून प्रतिबंधक गुटखा साठा नेला जात असल्याची माहिती या अन्न व औषध विभागाच्या पथकाला मिळाली होती.
5/11
त्यानंतर तेल्हारा पोलिसांसह या पथकाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत गुटखा वाहून नेणारे वाहन पकडले.
Continues below advertisement
6/11
या कारवाई दरम्यान, एकत्रित 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
7/11
या प्रकरणी बाला जयस्वाल नामक व्यक्तीला अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.
8/11
काल (सोमवारी, ता २२) रात्री उशिरा ही कारवाई केलीय.
9/11
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक गुटखा साठा विरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मोठी धडक कारवाई केली आहे.
10/11
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली असून, या गुटखा तस्करीच्या रॅकेटची पाळेमुळे कुठपर्यंत पसरली आहेत याचा कसून तपास केला जात आहे.
11/11
तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
Published at : 23 Jun 2026 10:29 AM (IST)