Akola Rain: आठवडाभरापासून तापमान 45 अंशांपर्यंत, अकोल्यात अचानक पावसाच्या हजेरीने दिलासा; चिमुकल्यांनी पावसात भिजत लुटला आनंद

गेल्या आठवडाभरापासून कमाल तापमान सातत्याने 45 अंशांच्या उंबरठ्यावर असताना अचानक आलेल्या पावसाच्या हजेरीने अकोलेकर सुखावले आहेत.

Akola News

1/7
अकोल्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज दुपारी तीन वाजता सुमारास अकोला शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस झालाय.
2/7
तब्बल 15 ते 20 मिनिट हा पाऊस सुरू होता.. गेल्या काही दिवसापासून अकोल्याचे तापमानात प्रचंड वाढ होती.
3/7
अकोल्याचा तापमानाचा पारा एप्रिल अखेर 45 अंशापार पोचला होता.. वाढत्या तापमानामुळे अकोलेकरांची लाहिलाही झाली होती.
4/7
आजच्या पावसामुळे अकोलेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला..
5/7
दुपारच्या वेळी अचानक आलेल्या पावसाने अकोलेकरांची धावपळ उडाली होती.. तर चिमुकल्यांनी पावसात भिजत आनंद लुटलाय.
6/7
सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा सडाका येऊन गेल्याने हवेत काहीसा गारवा होता.
7/7
जवळपास 10 मिनिट अकोला शहरातल्या मोठी उमरी भागात पाऊस सुरु होता.. तर सोबतच विजेचा कडाकडाटासह वारा वाहत होता..
Sponsored Links by Taboola