Akola Accident News : अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
Akola : अकोल्यातील मूर्तिजापूर-कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement
अकोल्यात होंडा सिटी कारचा अपघात चार जणांचा मृत्यू
Continues below advertisement
1/5
अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर एका चारचाकी होंडा वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.
2/5
या घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी आहेत. या अपघातातील जखमींवर अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
3/5
आज सायंकाळी मूर्तिजापूरवरून कारंजाकडे परतणाऱ्या होंडा कारमधून 6 जण प्रवास करत होते. भरधाव कार रस्त्याच्या खाली शेतात जाऊन कोसळली.
4/5
या घटनेत रोहित रील या 25 वर्षीय तरुणाचा आणि संकेत मेश्राम या दोघांचा मृत्यू झाला आहे. रोहित हा वाल्मिकगनर, कारंजा येथील तर संकेत मेश्राम हा गवळीपुरा, कारंजा येथील रहिवासी आहे.
5/5
यशवंत राठोड, वय 31 वर्ष, रा कारंजा, अक्षय रोकडे, वय 27 वर्ष, रा. दादगाव ता. कारंजा , ओम मुंदे वय 19 वर्ष रा. कारंजा आणि आर्यन अंभोरे वय 19 वर्ष कारंजा हे चार जण जखमी झाले आहेत.
Continues below advertisement
Published at : 05 Feb 2026 10:11 PM (IST)
= 5">