शनि शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकले सील; पोलीस बंदोबस्तात कलेक्टरांकडून 'देऊळ कार्यालय बंद'
शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पोलीस बंदोबस्तात हे कार्यालय सील केले.
Shani shinganapur office seal
1/7
शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पोलीस बंदोबस्तात हे कार्यालय सील केले.
2/7
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय कार्यालय सिल केल्याने मंदिर परिसर आणि विश्वस्त मंडळात खळबळ उडाली आहे.
3/7
शनि शिंगणापूर देवस्थानवरील विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर येथे कागदपत्रांची हेराफेरी केली जात असल्याची बाब समोर आली होती.
4/7
येथील विश्वस्त मंडळावर भ्रष्टाचारासह अनेक आरोप करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ हे कार्यालय सील केले आहे.
5/7
विश्वस्त मंडळातील सदस्यांकडून मंदिर देवस्थान ट्रस्टसंदर्भातील भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट केले जाऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची कारवाई केली.
6/7
शनि शिंगणापूर देवस्थान कार्यालय सील करताना येथील कार्यकारी अधिकारी मात्र गैरहजर असल्याचे पाहायला मिळालं.
7/7
पोलीस बंदोबस्त आणि सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासकीय कार्यालय सील करण्यात आले आहे. त्यामुळे, आता येथील मंदिर समितीचा संपूर्ण कारभार शासनाकडे असणार आहे.
Published at : 27 Sep 2025 02:40 PM (IST)
= 7">