Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीनिमित्त 35 बाय 40 फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती उद्या म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अहमदनगरच्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे भव्य अशा रांगोळीत छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटण्यात आलंय.
या ठिकाणी 35 बाय 40 फूट अंतराची रांगोळी प्रमोद उबाळे यांनी काढली आहे.
स्मारक परिसरात अनिल वाघ इंद्रप्रस्थ स्पोर्ट्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी तलवार, दानपट्टा, लाठी-काठीचे प्रात्यक्षिके सादर केली.
अगदी लहानग्यांपासून ते युवकांनी सादर केलेल्या या प्रात्यक्षिकाने उपस्थितांची दाद मिळवली.
उद्या देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मिरवणुकीत अशी प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहे.
ही रंगोळी नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे.