Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाच्या सौंदर्यात आणखी भर; अंबर्जेजवळील बोद्यावर गेट वे ऑफ इंडियाची प्रतीकृती!

समृद्धी महामार्गावरील शहापूरातील अंबर्जे बोगद्याच्या आत जलचर प्राण्यांची चित्रे काढण्यात आली आहेत. तर बोगद्याच्या बाहेरील भागात गेट वे ऑफ इंडियाची राॅक पेंटींग द्वारे प्रतीकृती साकारण्यात आली आहे.

Continues below advertisement

Samruddhi Highway

Continues below advertisement
1/5
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेल्या स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण झालेला आहे. लवकरच या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
2/5
अशातच या महामार्गावरील शहापूरातील अंबर्जे गावाजवळ असणाऱ्या पाचशे मीटर लांब बोगद्याच्या आत जलचर प्राण्यांची चित्रे काढण्यात आली आहेत.
3/5
तर बोगद्याच्या बाहेरील भागात गेट वे ऑफ इंडियाची राॅक पेंटींग द्वारे प्रतीकृती साकारण्यात आली आहे.
4/5
सुमारे दोनशे फूट उंची व ७० हजार चौरस फूटांमध्ये साकारण्यात आलेली ही पेंटिंग प्रतिकृती पोदार थ्रीडी आर्ट यांनी तयार केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने ही पेंटींग बनविण्यात आली आहे.
5/5
या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं आकर्षण ठरणार असून, येथून प्रवास करणाऱ्यांना सहज भुरळ घालणारी ही पेंटींग खास आकर्षण ठरत आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola