Melghat Tiger Reserve : उष्णतेच तडाखा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यावर आलं वाघाचे अख्खे कुटुंब; अन् पुढे....
एरवी मेळघाटाच्या राखीव जंगलात जाण्यास बंदी असली तरी पक्षी सर्वेक्षणा दरम्यान वनकर्मचाऱ्यांसोबत तिथे दाखल झालेल्या पक्षिनिरीक्षकांना वाघाचे अख्खे कुटुंब पाणवठ्यावर पाणी पितांना दिसले.
Continues below advertisement
Melghat Tiger Reserve
Continues below advertisement
1/7
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे तिसरे पक्षी सर्वेक्षण पार पडले. एरवी मेळघाटाच्या राखीव जंगलात जाण्यास बंदी असली तरी पक्षी सर्वेक्षणा दरम्यान वनकर्मचाऱ्यांसोबत तिथे दाखल झालेल्या पक्षिनिरीक्षकांना वाघाचे अख्खे कुटुंब पाणवठ्यावर पाणी पितांना दिसले.
2/7
पक्षिनिरीक्षक किरण मोरे, मनीष ढाकूलकर, प्रशांत तिरमारे यांना तीन बछड्यांसह वाघाच्या जोडप्याचे दर्शन झाले.
3/7
मेळघाटात एका बशीच्या आकाराच्या पाणवठ्या जवळ एक जुने मचाण होते. थकल्यामुळे पुढचे पक्षिनिरीक्षण मचाणावर बसून करण्याचे पक्षीनिरीक्षक यांनी ठरविले.
4/7
दरम्यान, काही वेळातच त्याठिकाणी एक वाघीण सावकाशपणे पाणवठ्यावर आली आणि पाणी पिऊ लागली.
5/7
काही क्षणांतच मचाणाखालून तीन बछडे एकत्रित पाणवठ्याकडे जात असल्याचे त्यांना दिसले.
Continues below advertisement
6/7
जवळपास दहा मिनिटांनी एक वाघ पायवाटेवरून मचाणाजवळ आला आणि पाणवठ्याकडे न जाता परत फिरला.
7/7
यावेळी पक्षीनिरिक्षणाकरिता गेलेल्यांना वाघांचे कुटुंब पाहायला मिळाले.
Published at : 24 Feb 2025 05:07 PM (IST)