2021 New Year Gifts | नववर्षाच्या पहिल्या दिवशी 'हे' खरेदी करा; वर्षभर घरात नांदेल सुख-समृद्धी
हत्ती/गणपतीची मूर्ती : जर तुमच्या कुंडलीत राहु आणि केतूचा वाईट प्रभाव असेल तर चांदीचा छोटा हत्ती घरात ठेवता येईल. तर चांदीच्या हत्तीची मूर्ती ठेवता न आल्यास गणपतीची मूर्तीसुद्धा ठेवता येईल
स्वस्तिक : असे म्हटले जाते की स्वस्तिकात फक्त आपल्या लडक्या गणपती बाप्पाचं वास्तव्य असतं. म्हणूनच या प्रतिकात्मक चिन्हाला सर्वात पवित्र मानला जातं. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वस्तिक विकत घरी आणणे शुभ मानलं जातं.
पोपटाचं चित्र : पोपट हा खूप शुभ पक्षी मानला जातो. जर या पोपटचे चित्र घरात ठेवले तर खूप चांगले परिणाम दिसून येतात. असे म्हणतात की एक पोपट चांगलं नशीब आणतो.
नारळ : असा विश्वास आहे की त्रिदेव नारळामध्ये राहतात. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा समावेश केला जातो. दुसरीकडे, नवीन वर्षाच्या निमित्ताने घरात नारळ घरात ठेवल्यास पैशाची कमतरता कधी भासत नाही.
मोराचा पंख : जर तुम्हाला नविन वर्षात चांगल्या गोष्टी घडाव्यात अस वाटत असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात मोराचे पंख घरी आणा. तुमचं नशीब फळफळेल आणि तुम्ही आयुष्यात प्रगती करालं असे म्हटले जाते.
कासव : घरात शांतता, आनंद आणि समृद्धीसाठी कासव ठेवणे शुभ मानले जाते. याचा सकारात्मक परिणाम घरातील सदस्यांच्या आरोग्यावर होतो.