PHOTO | दिल्लीत खासदारांसाठी बांधलेले नवे आलिशान फ्लॅट्स
![PHOTO | दिल्लीत खासदारांसाठी बांधलेले नवे आलिशान फ्लॅट्स PHOTO | दिल्लीत खासदारांसाठी बांधलेले नवे आलिशान फ्लॅट्स](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25043802/web-del-flats-photo-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
अनेक मंत्र्यांचे बंगले अशाच पद्धतीचे आहेत. दिल्लीतल्या ल्युटियन्स झोनमधले हे बंगले खासदारांप्रमाणेच, न्यायमूर्ती, लष्करी अधिकारी यांच्यासाठीही राखीव असतात. त्यामुळे काही नव्या खासदारांसाठी हे बांधण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![PHOTO | दिल्लीत खासदारांसाठी बांधलेले नवे आलिशान फ्लॅट्स PHOTO | दिल्लीत खासदारांसाठी बांधलेले नवे आलिशान फ्लॅट्स](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25043751/web-del-flats-photo-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
दिल्लीत जुन्या काळात खासदारांसाठी केवळ बंगले उपलब्ध होते, पण त्यातल्या अनेक बंगल्याची आता दुरावस्था झाल्यानं त्याऐवजी फ्लॅटस उभारले जाऊ लागले आहेत. टुमदार बंगला, समोर हिरवळ ही दिल्लीतल्या व्हीआयपी बंगल्याची शान मानली जाते.
![PHOTO | दिल्लीत खासदारांसाठी बांधलेले नवे आलिशान फ्लॅट्स PHOTO | दिल्लीत खासदारांसाठी बांधलेले नवे आलिशान फ्लॅट्स](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25043738/web-del-flats-photo-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
दिल्लीत खासदारांसाठी बनले आहेत 76 नवे आलिशान फ्लॅटस..काल पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते खासदारांसाठी बांधलेल्या या नव्या वास्तूचं उद्घाटन झालं. दिल्लीतल्या विशंभर दास रोड परिसरात गंगा-यमुना-सरस्वती या 13 मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत.
218 कोटी रुपये खर्चून या तीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. अवघ्या दोन ते अडीच वर्षात हे सगळं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. ज्या परिसरात खासदारांसाठी या नव्या सदनिका उभारण्यात आल्या आहेत तिथे आधी 8 बंगले होते. त्यातल्याच एका बंगल्यात राष्ट्रवादीचं दिल्ली कार्यालयही होतं.
यात साधारण साडेचार हजार स्क्वेअर फूट आकाराचे आलिशान फ्लॅटस खासदारांसाठी तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक फ्लॅटमध्ये 4 बेडरुम, डायनिंग हॉल, ड्राईंग हॉल, फॅमिली लाँज, 1 ऑफिस, स्टाफसाठी 2 रुम, 1 पूजाघर अशी सगळी व्यवस्था आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -