मुंबईत आठ फुटी अजगराने पूर्व द्रुतगती महामार्ग अर्धा तास रोखला!
अखेर या अजगराला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर ती कार बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
स्थानिक नगरसेवक कप्तान मलिक यांनी याची माहिती महाराष्ट्र अॅनिमल रेस्क्यू असोसिएशनच्या सर्पमित्रांना दिली. मग सर्प मित्र अभिरुप कदम, सिद्धार्थ गायकवाड आणि सुनील कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या शर्थीने या अजगराला सुरक्षित बाहेर काढून जीवनदान दिले.
सोमय्या मैदानातून एक आठ फूट लांबीचा अजगर या पूर्व द्रुतगती महामार्गावर आला आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारच्या चाकात जाऊन बसला.
यानंतर त्यांनी गाडी तशीच उभी केली. मात्र यामुळे मागून येणाऱ्या वाहनांचा चांगलाच खोळंबा झाला.
मात्र तोपर्यंत या मार्गावर सायनकडे जाणारी सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती. तर बघ्यांचीही मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती.
पूर्व द्रुतगती महामार्गावर चुनाभट्टी इथल्या के जे सौमया दवाखान्यासमोरील एवराडनगर इथे एक अजगराने सकाळच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास वाहतूक विस्कळीत केली होती.
खड्ड्यांमुळे किंवा साचलेल्या पाण्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं किंवा वाहतूक विस्कळीत झाल्याचं अनेकांना माहित आहे. परंतु पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक आज चक्क एका अजगराने रोखली.