PHOTO | मुंबईमध्ये मुसळधार पावसात दोन ठिकाणी इमारती कोसळल्याची दुर्घटना; 8 जणांचा मृत्यू

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 'मुंबईत सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस सुरु आहे. अशात इमारत खचण्याचा किंवा कोसळण्याचा धोका वाढला आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात अनेक जुन्या इमारती आहेत. मुंबई महापालिकेने 2019 मध्ये या इमारतीला धोकादायक घोषित करुन नोटीस जारी केली होती. अनेक कुटुंब इमारत सोडून गेले होते. मात्र आठ कुटुंब इमारतीतच राहत होती.'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी फोर्टमधील एका सहा मजली इमारतीचा काही भाग कोसळला. दुर्घटनेला 15 तास उलटून गेल्यानंतरही बचाव कार्य अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत यातून 24 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. तर अजूनही दोन जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोसळलेली इमारत म्हाडाकडून खाली करण्यात आली होती. या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरु होतं. गुरुवारी सकाळीच इमारतीच्या मालकाने इमारत रिकामी करवून घेतली होती अशी माहिती मिळत आहे.
महानगरपालिकेच्या (बीएमसी) वतीने सांगण्यात आलं की, मालाडमधील दुर्घटनेची माहिती मिळतातच, अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचाव कार्यास सुरुवात झाली. 15 लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं. बीएमसीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या दुर्घटनेमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 13 इतर लोक घायल झाले आहेत. त्यांनी सांगितलं की, जखमींना मालाड पूर्व येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्टमधील मिंट रोडवर असलेल्या भानुशाली बिल्डिंग आधीपासून धोकादायक असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तीन मजली चाळसदृश असलेल्या इमारतीचा काही भाग बुधवारी दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी कोसळला.
दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार अरविंद सांवत, मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडूनही त्यांनी माहिती घेतली होती. जखमींना उपचारांसाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबईमध्ये बुधवारी मुसळधार पावसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी इमारती कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या . मुंबई इपनगरामध्ये एका चाळीचा काही भाग कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, फोर्ट परिसरात भानुशाली बिल्डिंगचा मोठा भाग कोसळला आहे. या घटनेत दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -