PHOTO Tejas Express | भारतातील पहिली कॉर्पोरेट ट्रेन 'तेजस एक्सप्रेस' 14 फेब्रुवारीपासून पुन्हा धावणार
प्रवास करताना प्रवाशांना कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलंय. भारतातील पहिली खासगी किंवा कॉर्पोरेट ट्रेन म्हणून तेजसची ओळख आहे. आयआरसीटीसीने भारतीय रेल्वेकडून ही ट्रेन भाड्याने घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना काळात 19 मार्चला तेजस एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबरला ती पुन्हा सुरु करण्यात आली. कोरोनामुळे गाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा ही गाडी बंद करण्यात आली होती.
आयआरसीटीसीने सांगितले आहे की मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस ही आठवड्यातून चार वेळा धावेल. अंधेरी, बोरीवली, वापी, सुरत, भरुच, वडोदरा आणि नदियाड या स्थानकावर ती थांबेल.
भारतातील पहिली कॉर्पोरेट ट्रेन अशी ओळख असलेली गाडी 'तेजस एक्सप्रेस' पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. तेजस एक्सप्रेस ही आधुनिक सोयींनी युक्त अशी अलिशान ट्रेन आहे.
कोरोना काळात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद करण्यात आलेली मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस ही येत्या 14 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. त्याचसोबत लखनौ-दिल्ली दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेसही पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -