'मिर्झापूर 2'मध्ये मुन्ना भैय्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण?
काही काळापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या यामी गौतम आणि गिन्नी वेड्स सनी मध्ये दिसून आली. 'मिर्जापूर 2' नंतर ईशा तलवार ओम प्रकाश मेहरांच्या तूफ़ान या चित्रपटात काम करते आहे.
ईशा 2017 मध्ये सलमान खानच्या 'ट्यूबलाइट' या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसली होती. दरम्यान सैफ अली खानच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या कालाकांडी चित्रपटातून ईशाला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. यानंतर ईशा 'आर्टिकल 15' आणि 'कामयाब' या चित्रपटांमध्ये दिसून आली.
ईशाने बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यापूर्वी साउथ इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावलं आहे. तीने ‘थट्टाथिन मरायातु’ या मल्यालम चित्रपटातून डेब्यू केला होता.
ईशाचा जन्म मुंबईत झाला. लहानपणापासून डान्सची शौकीन असलेल्या इशाने कोरिओग्राफर टेरेंस लुईस डान्स अॅकडमीमधून जॅज, हिपॉप आणि सालसा सारख्या वेगवेगळ्या डान्स प्रकारांची ट्रेनिंगही झाली आहे. 2000 मध्ये ईशा 'हमारा दिल आपके पास है' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून दिसली आहे.
ईशाचा जन्म मुंबईत झाला. लहानपणापासून डान्सची शौकीन असलेल्या इशाने कोरिओग्राफर टेरेंस लुईस डान्स अॅकडमीमधून जॅज, हिपॉप आणि सालसा सारख्या वेगवेगळ्या डान्स प्रकारांची ट्रेनिंगही झाली आहे. 2000 मध्ये ईशा 'हमारा दिल आपके पास है' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून दिसली आहे.
दरम्यान, ईशाचे वडिल विनोद तलवारही बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक होते. तसेच त्यांनी काही चित्रपटांत अभिनयही केला आहे.
'मिर्जापूर 2' मध्ये जरी ईशा तलवार साडीमध्ये साधी दिसत असली तरी ती खऱ्या आयुष्यात बोल्ड आहे. स्वत: ईशाने आपल्या बोल्ड अंदाजातील फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची मिर्झापूर वेब सीरिज ही दोन वर्षापूर्वी आली. यातील कलाकारांच्या भूमिकेमुळे मिर्झापूर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली . 22 ऑक्टोबरला मिर्झापूर वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन वर्षानंतर आता पुन्हा प्रेक्षकांना कालिन भय्या आणि त्याचा मुलगा मुन्ना भय्याची दहशत अनुभवायला मिळणार आहे. दुसऱ्या सीझनमध्ये बर्या च नवीन कलाकारांना संधी देण्यात आली आहे. मिर्झापूर 2 मध्ये अभिनेत्री ईशा तलवारने माधुरी यादवची भूमिका साकारली आहे. या सीझनमध्ये मुन्ना त्रिपाठीची पत्नी आणि यूपीची मुख्यमंत्री या भूमिकांची बरीच चर्चा होत आहे.