उद्धव ठाकरेंसाठी कायपण! मुलाखत ऐकण्यासाठी मिलिंद नार्वेकर जमिनीवर बसले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सुरु असताना त्यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर खाली बसून मुलाखत ऐकत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे आपल्या निवास्थानावरून लाईव्ह या कार्यंक्रमात सहभागी झाले होते.
मिलिंद नार्वेकर हे एक शिवसैनिक होते. मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे.
1992च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला. नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने नार्वेकरांनी मातोश्री गाठली.
एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले मिलिंद नार्वेकर हे शाखाप्रमुख होण्यासाठी मुलाखत देण्याकरिता उद्धव यांना पहिल्यांदा भेटले.
हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा नार्वेकरांमधील चमक पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. मिलिंद नार्वेकरांना पटकन उत्तर दिलं तुम्ही सांगाल ते.
तेव्हापासून मिलिंद नार्वेकर हे सावलीसारखे उद्धव यांच्यासोबत आहेत. साधारण 1994 सालच्या उत्तरार्धात मिलिंद नार्वेकर रितसर उद्धव ठाकरे यांचे पीए बनले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -